जेष्ठ नगरसेविका सिमाताई सावळे यांच्या कार्यकाळात मंजूर केलेला रोटरी पूल आजपासून वाहतुकिसाठी खुला

0
234

पिंपरी, दि.१० (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर प्रथम स्थायी समिती अध्यक्ष होण्याचा मान मिळालेल्या जेष्ठ नगरसेविका सिमाताई सावळे यांच्या कार्यकाळात मंजूर केलेल्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील निगडी येथील भक्ती शक्ती चौकैतील रोटरी पुलाला अखेर मुहूर्त मिळाला. आज पासून हा पूल वाहतुकिसाठी खुल करण्यात आला. शहराचे प्रवेशद्वार असलेल्या निगडी येथील भक्ती शक्ती चौकात वारंवार वाहतूक कोंडी होत होती. पाच प्रमुख रस्ते एकत्र येत असल्याने या ठिकाणी दुमजली उड्डाण पुलाचा प्रस्तावतयार करण्यात आला होता. प्रथम स्थायी समिती अध्यक्षा सिमाताई सावळे यांच्या कार्यकाळातच या कामाला मंजुरी देण्यात आली.

शहरातून जाणाऱ्या जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर या चौकात वारंवरा वाहतूक कोंडीमुळे नागरिक खूप त्रस्त होते.  त्याची जाणीव ठेवून हा पूल तातडीने मंजूर करून तो वेळेत पूर्ण व्हावा यासाठी सौ. सावळे या विशेष आग्रही होत्या. आज उद्याघटनाच्या निमित्ताने सावळे यांनी पूल सुरू होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

शहरातील या रोटरी उड्डाण पुलाचे विशेष म्हणजे तो सिग्नल फ्री आहे. भक्ती-शक्ती चौक येथील पुणे-मुंबईकडे जाणा-या उड्डाणपुलाचा समांतर आहे. पुणे गेट हॉटेल ते कृष्णा मुंदीरापयपत जाणा-या व येणा-या वाहनांसाठी प्रत्यकी एक स्वतंत्र पूल आहे. पुलाची लांबी ८४९ मीटर तर, रुंदी १७.२ मीटर (२ लेन दोन्ही बाजुने) आहे.

पुलाची उंची ८.५ मीटर आहे. पुणे कडील बाजु २१७ मीटर तर मुंबईकडील बाजु १३५ मीटर आहे. फक्त उड्डाण पुलासाठीचा खर्च २४.६२ कोटी रुपये आहे. पुणे मुंबई रस्त्याला समांतर उड्डाणपूलाखालुन बीआरटी टर्मिनल व पीएमपीएमएलच्या डेपोकडून सबवे बसेस सहज धावणार आहेत. या पुलामुळे प्रवासाच्या वेळेत बचत, इंधन बचत व वायु प्रदुषणात घट होणार आहे. पर्यावरण संवधर्धनास हातभार लागणार आहे. उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाले, पण रोटरी आणि ग्रेड सेपरेटरचे काम अद्याप थोडे बाकी आहे.जानेवारी मध्ये ते पूर्ण होईल. महापालिकेत भाजपाची सत्ता आली त्यावेळी जुलै २०१७ मध्ये या कामाला मंजुरी घेऊन त्याची वर्क. ऑर्डर देण्यात आली
ऑगस्ट २०१७ मध्ये राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. प्रत्यक्षात कामाची सुरवात सप्टेबंर २०१७ मद्ये झाली आणि ५ डिसेंबर २०२० ला काम पूर्ण झाले. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे या कामाला ६-७ महिने उशिर झाला, अशी माहिती   उप अभियंता (बीआरटीएस) विजय भोजने यांनी दिली.

भक्ती-शक्ती चौकातील उड्डाणपुलाचे उदघाटन आज (गुरुवारी, दि. 10) महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते झाले. उदघाटनानंतर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. दरम्यान, महापौरांच्या अगोदर एक दिवस राष्ट्रवादीकडून या उड्डाणपुलाचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी आमदार महेश लांडगे, उपहापौर केशव घाळवे, सत्तधारी नेते नामदेव ढाके, स्थायी समितीच्या
माजी अध्यक्षा व जेष्ठ नगरसेविका सिमाताई सावळे, नगरसेविका आशा शेंडगे, सचिन चिखले,
कमल माजी ब नगरसेविका करुणा चिंचवडे, शैलजा मोरे, सुमन पवळे, केदळे, अमित गावडे, सह शहर अभियंता श्रीकांत भोजने याच्यासह अधिकारी उपस्थित होते.