जातीचे राजकारण करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला; पंकजा मुंडेंचा शरद पवारांवर निशाणा

0
635

बीड, दि. ३ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीत जातीचे राजकारण करणाऱ्यांना जनतेने चांगलाच धडा शिकवला, अशा शब्दांत राज्याच्या ग्रामविकास मंत्री  पंकजा मुंडे यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त गोपीनाथ गडावर आयोजित कार्यक्रमात मंत्री मुंडे बोलत होत्या.

यावेळी त्या पुढे म्हणाल्या की, काही नेते स्वतःला राजा, महाराजा, जाणता राजा म्हणवून घेतात. याच लोकांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांबाबत जातीवाचक विधान केले होते, अशा जातीयवादी लोकांना मुख्यमंत्री पुरुन उरले आहेत, असा टोलाही  त्यांनी  शरद पवार यांचे नांव न घेता लगावला.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसष मराठवाड्यातील भाजपचे नवनिर्वाचित खासदार रावसाहेब दानवे, प्रीतम मुंडे, सुजय विखे पाटील, जयसिद्धेश्वर स्वामी, संजय जाधव, ओम राजेनिंबाळकर, प्रताप चिखलीकर  उपस्थित होते.