“जयंत पाटील साहेब… ती स्व.अहमद पटेल यांची श्रद्धांजली सभा आहे, पवार साहेबांचा वाढदिवस समारंभ नाही”

0
625

मुंबई,दि.१५(पीसीबी) – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस नेते राज्यसभा खासदार स्व. अहमद पटेल यांची शोकसभा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी मान्यवरांनी आठवणांनी उजाळा दिला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, यांच्यासह महाविकास आघाडीतील इतर मंत्री व नेते देखील उपस्थित होते.

याच शोकसभेतील एका फोटोमुळे भाजपचे आध्यत्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना आठवण करुन द्यायला हवी होती की ते स्व.अहमद पटेलजी यांच्या श्रद्धांजली सभेला गेले होते. त्यांच्या भावमुद्रेवरुन असे वाटते आहे की, ते अजूनही पवार साहेबांच्या वाढदिवस समारंभातच आहेत’. असा घणाघात भोसले यांनी केला आहे.

दरम्यान, दुसरीकडे हा महाराष्ट्र ज्यांच्यामुळे घडला, वाढला, समृद्ध झाला, सुजलाम-सुफलाम झाला अशा निवडक लोकांची नावं काढली तर त्यात अर्थात छत्रपती शिवाजी महाराज येतात. फुले, शाहू, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, यशवंतराव चव्हाण यांचे स्थान आहे. आज त्या पंगतीत आपले नेते शरद पवार साहेबसुद्धा आहेत. असे विधान केल्याने आधीच जयंत पाटील यांच्यावर टीका होत आहे.