जपानच्या राजकीय वर्तुळात कुजबुज; जपानचे पंतप्रधान शिंजो आबे राजीनामा देण्याच्या तयारीत?

0
468

जपान, दि.२८, (पीसीबी) : जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आपल्या तब्येतीच्या तक्रारीमुळे बैचेन आहेत. त्यांच्या आजारपणामुळे ते आता राजीनामा देणार का? अशी चर्चा रंगली आहेत. मधल्या काळात आबे पार्टी मुख्यालयातील उच्च अधिकाऱ्यांना भेटत होते. त्यामुळे ‘शिंजो आबे बऱ्याच दिवसांपासून आजारी असल्याने आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊ शकतात’, असा अंदाज जपानच्या राजकीय वर्तुळातून बांधला जात आहे. शिंजो आबे यांनी याबाबत अजूनही कोणतीही घोषणा केलेली नाहीये. तब्येतीच्या तक्रारीमुळे त्यांना गेल्या आठवड्यात दोन वेळा रुग्णालयात जावं लागलं होत.

“जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी आपल्या आरोग्याच्या तक्रारीमुळे पंतप्रधान पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे.” अशी माहिती जपानमधील एनएचके टेलिव्हिजन आणि इतर मीडिया रिपोर्टनुसार देण्यात आली आहे. मात्र, जपानच्या पंतप्रधान कार्यालयाने यासंदर्भात कोणतंच अधिकृत मत व्यक्त केलं नाहीये. शिंजो आबे यांनी याआधीही 2007मध्ये आपल्या आजारपणामुळे आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता.