जगातील १४ अशा रहस्यमयी घटना, ज्यांचा उलगडा आजही कुणालाच करता येत नाहीये…

0
1135

आज माणसाने भरपूर प्रगती केली आहे. एवढी प्रगती कि, मानव आज चंद्रावर पोहचला आहे. मंगळावर पोहचला आहे. एवढ्यावरच तो थांबला नाही तर, अवकाशात जाऊन तो इतर ग्रहांचा पण शोध घ्यायला लागला. परंतु, तरीही आजही मानवाच्या आजूबाजूला काही गूढ गोष्टी आहेत जे आजपर्यंत एक न उलगडलेले कोड, एक रहस्य बनून राहील्या आहेत. तर आपण जाणून घेणार आहोत त्या एक कोड बनून राहिलेल्या जगातील अशा १४ गूढगोष्टी…

तमम शुदऑस्ट्रेलिया मधील एडिलेंड मध्ये येणाऱ्या सोमर्टन समुद्र किनाऱ्यावर डिसेंबर १९४८ रोजी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह मिळाला होता. या व्यक्तीच्या खिशात एक कागद मिळाला त्यावर लिहलं होत “तमम शुद” या शब्दांच अर्थ लावल्यानंतर ओमर खैयाम नुसार “अंत” आणि “खात्मा” हे शब्द मिळाले. पण या माणसाची ओळख आजपर्यंत जगातही कुणालाच माहिती नाही.

दि लोक नेस मॉनस्टर

‘दि लोक नेस मॉनस्टर’ याच्या विषयीसुद्धा बऱ्याच रहस्यमयी गोष्टी आहेत. काही लोकं म्हणतात की, हा एक समुद्री जीव आहे. याचे कितीतरी फोटो आणि विडिओ बनलेले आहेत. ते बघून कुणी म्हणत की हा कदाचित समुद्री साप किंवा डायनासोर असेल. याला कधी पाण्याच्या वर तर कधी पाण्याच्या आत बघितलं असे लोक म्हणतात. पन हा नेमका कोणता प्राणी आहे. हे अजून कुणालाही समजलं नाहीये.

बिगफूट‘बिगफूट’ ला लोक ‘सांस्क्वेच’ नावाने सुद्धा ओळखतात. लोकांच्या म्हणण्यानुसार, युनायटेड स्टेट आणि कॅनडा च्या हिमाच्छादित भागात ‘बिगफूट’ आढळलतो. याला जर निरखून बघितलं तर हा दुरून गोरिला आहे असं भासत, तर याच्या चालण्याच्या पद्धतीवरून लोक याला एक ‘मानव’ आहे असं म्हणतात. पण हा नेमका प्राणी आहे का माणूस हे कुणालाही माहिती नाही.

जॉर्जिया गाईड्स्टोनअमेरिकेतील प्रति स्टोनएज म्हणून ओळखला जाणारा एलबर्ट काउंटी मध्ये असलेला गाईडस्टोनच्या आजूबाजूला बऱ्याच गूढ कथा गुंतलेल्या आहेत. हे १९७९ मध्ये बनवलं गेलं आहे. या भिंतीवर इंग्रजी, हिंदी,स्वाहिली, हिब्रू, अरबी, चायनीज, रशियन आणि स्पॅनिश भाषेत लिहलं आहे. पाम आजपर्यंत कुणालाही नाही समजलं की हे कशासाठी आणि का इथे लिहलं आहे.

रोंजारोंजो

या जगात एक नक्षीदार असे लाकूड आहे ज्याला लोक ‘रोंजारोंजो’ म्हणतात. हे नक्षीदार लाकूड रहस्यमयी ईस्टर द्वीपवर आहे. या नक्षीदार लाकडावर काहीतरी लिहिलं आहे जे आजवर कुणालाही नाही समजल. असे दोन डझन लाकडावरील सांकेतिक भाषेत लिहलेले संदेश आहेत ज्यामध्ये बहुमुल्य माहिती साठवलेली आहे. परंतु हि आजवर कोणालाही डिकोड करता आली नाही आहे.

अश्वेत दाहलीयाची हत्याया २२ वर्षीय एलिझाबेथ. शॉर्टच्या दरम्यान शोबिज इंडस्ट्री मध्ये प्रमोशन करण्यात व्यस्त असताना त्यांची हत्या करण्यात आली. पण ही हत्या कुणी केली हे अजूनही न उलघडणार कोडं बनून आहे.

तुरीन‘तुरीन’ हा एक असा कापड आहे ज्यावर एका माणसाच्या चेहऱ्याची कलाकृती आहे. आणि हे आजच्या वैज्ञानिकांना शोधण्यासाठी आव्हान बनले आहे. पुष्कळशा लोकांचं म्हणणं आहे की, हा चेहरा नाजरेथच्या ईसा मासिहा असू शकतो. पण हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये.

पत्र आणि दोरी वापरणार हत्यारासॅन फ्रान्सिस्को मधील भागात १९६०-७० च्या दशकात हा हत्यारा होऊन गेला, ज्याला पोलीस आणि प्रेस ही ‘दोरी-पत्र’ हत्यारा म्हणून ओळखत होती. हा हत्यारा पोलिसांना असे पत्र लिहत होता की, त्यांच्यावर वेडं होण्याची वेळ येत असे. याने पाठवलेल्या चार पत्रांपैकी एकाच अर्थ लावण्यात यश आले मात्र बाकी तीन पत्राचा अर्थ अजूनही कुणालाच लावता आलेला नाहीये.

शेफर्ड वास्तूवरील लिखाणइंग्लंडमधील स्टेफोर्डशायरमध्ये असलेल्या एका मूर्तीवर केलेल्या लिखाणाला आजपर्यंत सर्वात हुशार माणसाला सुद्धा समजत आले नाही. असं म्हणतात कि, १८ व्या शतकामध्ये ही वास्तू बनवण्यात आली आणि इथे सापडणाऱ्या चिठ्ठ्या २५० वर्षानंतर सुद्धा कुणालाही वाचता येत नाहीत.

क्रिप्टओस

व्हर्जिनिया मधील लाँगलेच्या सि.आय.ए हेडक्वार्टरच्या बाहेर असणाऱ्या कलाकृतीवर कोरलेलं आहे. जिम सनबॉर्न यांनी ही सुंदर कलाकृती बनवली होती. याच्या माध्यमातून त्यांना सांगायचं होत की, प्रत्येक वस्तूला पॅटर्न आणि क्लूच्या माध्यमातून डिकोड केलं जाऊ शकते. यावर चार भागात कोरलेलं आहे. यापैकी तीन भागाची माहिती मिळवली पण चौथ्या भागाची माहिती सी.आय.ए च्या सर्वात हुशार माणसाला सुद्धा मिळविता आली नाही.

बरमुडा ट्रँगलबरमुडा, मियामी आणि पोर्तो रिको दरम्यान येणाऱ्या या भागाबद्दल खूप रहस्य आहेत. आणि हा भाग म्हणजे ‘बरमुडा ट्रँगल’. या भागातून जाणारे पायलट सांगतात की, येथून बरेच विमान रहस्यमयी रित्या गायब झालेत, त्याच बरोबरच बरेच जहाज सुद्धा समुद्रामध्ये अचानक गायब झालेत. त्यांच्याशी संपर्क अचानकपणे बंद झाला. बरेच लोक समजतात की, हे सर्व एलियन किंवा गॅस प्रेशर मुळे होते, पण यामागील नेमकं कारण अजूनही कुणालाच सापडलं नाही.

जैक दि रिपर“जैक दि रिपर” हे नाव आपण बऱ्याच चित्रपटात, नाटकात, मालिकामध्ये ऐकलं असेल, बघितलं असेल. १८ व्या शतकातील ह्या कुख्यात हत्याऱ्याने लंडनच्या पूर्वी भागात ११ महिलांना अत्यंत निर्दयीपणे मारलं होत. त्याने ज्या महिलांना मारलं त्या सर्व त्यावेळच्या वैश्याव्यवसाय करणाऱ्या होत्या. हा नराधम त्यांचे अश्या प्रकारे तुकडे करायचा की त्यांना कुणीही ओळखू शकत नव्हते. पण आश्चर्याची गोष्ट ही आहे की, त्याला कधीच कुणी बघितलं नाही आणि त्याला पकडण्यातही आलं नाही.

ताओस हम्महे सुंदर व छोटस असणार शहर न्यू मेक्सिको मधील “ताओस” मुळे चांगलंच प्रसिद्ध आहे. या शहराच्या बाहेर डिझेल इंजिनच्या चालण्याचा आवाज ऐकायला येतो, हा आवाज सर्वांना स्पष्टपणे ऐकायला येतो, पण हे कुठले यंत्र आहे आणि याचा आवाज कुठून येतो याचा शोध अजूनही लागला नाहीये. या आवाजाला “ताओस हम्म” असे म्हणतात.

वॉयनिश लिपीविज्ञान आणि तंत्रज्ञानात मानवाने कमी काळात खूप प्रगती केली आहे. पण या भाषेतील लिपी आजपर्यंत कुणीही वाचू शकलं नाही. आणि जी पण काही थोडी माहिती भेटते ती त्यावरील चित्रावरूनच. या चित्रांवरूनच काय लिहिलं आहे याचा अंदाज बांधवा लागतो. ही रहस्य उलगडल्यास अनेक बहुमुल्य ज्ञान मनुष्यास मिळेल यात शंका नाही..