चोवीस तासांत देशात तब्बल ११,९२९ कोरोना रुग्णांची वाढ

0
373

 

नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) : भारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ३ लाख २० हजारांवर गेली आहे. मागील २४ तासांमध्ये सर्वाधिक ११ हजार ९२९ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. २४ तासात सर्वाधिक ३११ बळी गेले तर कोरोनाबाधितांच्या संख्येत आत्तापर्यंतची सर्वाधिक ११ हजार ९२९ ने वाढ झाली आहे. सलग चौथ्या दिवशी ३०० पेक्षा जास्त बळी गेले आहेत. तर दिवसभरात ८ हजार ५० रुग्ण बरे झाले आहेत.

देशात १ लाख ६२ हजार ३७९ रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट ५०.५९ टक्के आहे. सध्या कोरोनाची लागण असलेले १ लाख ४९ हजार ३४८ रुग्ण आहे. कोरोनामुळे आतापर्यंत ९ हजार १९५ जणांचा मृत्यू झाला आहे.
जगभरातील भारत चौथ्या क्रमांकावर
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढताना दिसत आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत भारताने शुक्रवारी भारताने ब्रिटनला मागे सोडलं. त्यामुळे भारत जगभरातील कोरोना बाधित देशांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. अमेरिका, ब्राझील, रशिया नंतर कोरोना महामारीमुळे सर्वाधिक प्रभावित देशांमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर आहे. भारतापेक्षा अधिक रुग्ण अमेरिका अमेरिका (२१,४२,६७२), ब्राजील (८,५०,७९६), रशिया (५,२०,१२९)मध्ये आहेत. तर भारत रुग्ण वाढीचा वेगात जगभरात तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिका आणि ब्राझीलनंतर एक दिवसात सर्वाधिक रुग्ण भारतात आहेत.

अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत टॉप-५ राज्य
आकडेवारीनुसार, देशात सध्या १ लाख ४९ हजार कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सर्वात जास्त अॅक्टिव्ह केस महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात ५१ हजारांहून अधिक कोरोना बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यानंतर दुसरा क्रमांकावर दिल्ली, तिसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू, चौथ्या क्रमांकावर गुजरात आणि पाचव्या क्रमांकावर पश्चिम बंगाल आहे. या पाच राज्यांमध्ये सर्वात जास्त अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत जगभरात भारत चौथ्या क्रमांकावर आहे. म्हणजेच, भारत असा चौथा देश आहे, जिथे सध्या सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णांवर रूग्णालयात उपचार सुरु आहेत. देशात ३ जूनपासून अनलॉक केल्यानंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत १ लाख १३ हजार ३०७ रुग्णांची वाढ झाली आहे तर मृतांची संख्या ३ हजार ३८० ने वाढली आहे.