चिखलीत वडिलांना शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा

0
817

चिखली, दि. १८ (पीसीबी) – मुलाने स्वत:च्या वडिलांना शिवीगाळ करत मोबाईल फोन फेकून डोक्यात मारुण जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना चिखली पोलीस ठाणे हद्दीत घडली.

याप्रकरणी पीडित ५२ वर्षीय वडिलांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, त्यांच्या २५ वर्षीय मुला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पीडित ५२ वर्षीय इसम हे त्यांच्या घरी असताना. त्यांच्या २५ वर्षीय मुलाने मोबाईल फोन फेकून त्यांच्या डोक्यात मारुन जखमी केले. तसेच शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी आरोपी मुला विरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मुलाला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. चिखली पोलीस तपास करत आहेत.