चिखलीत भावांना मारुन टाकण्याची धमकी देऊन अल्पवयीन तरुणीला लग्नासाठी धमकावले

0
521

चिखली, दि. २६ (पीसीबी) – भावांना मारुन टाकण्याची धमकी देऊन एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीला लग्नासाठी धमकावल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बुधवार (दि.२४) रात्री साडेआठच्या सुमारास तळवडे रुपीनगर येथील अजिंक्यतारा हौसिंग सोसायटीजवळ घडली.

याप्रकरणी अल्पवयीन तरुणीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, प्रथमेश वाघमारे नावाच्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रथमेश हा १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीचा सारखा पाठलाग करायचा. बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास तरुणी तिच्या घरासमोर उभी असताना. प्रथमेश तिच्याजवळ आला आणि त्याने, “तु माझ्यासोबत लग्न कर नाहीतर तुझ्या भावांना मारुन टाकी”, अशी धमकी देऊन हात पकडला. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात प्रथमेश विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथमेशला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. चिखली पोलीस तपास करत आहेत.