चिखलीत कोयता बाळगल्याने तरुणाला अटक

0
927

चिखली, दि. २ (पीसीबी) – कोयता बाळगल्याने एका तरुणाला पोलीसांनी अटक केली आहे. ही कारवाई चिखली पोलीसांन शुक्रवारी (दि.३०) रात्री दोनच्या सुमारास घरकुलचे मेन गेटजवळील रस्त्यावर करण्यात आली.

शक्तीकेश शिवकुमार प्रजापती (वय २३, रा. जनता हेअर कटींग सलुनचे मागे, रामनगर, चिंचवड) असे कोयत्यासह अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री चिखली पोलीस ठाण्यातील पोलीस चिखली परिसरात गस्त घालत असता त्यांना आरोपी शक्तीकेश हा संशयीतरित्या उभा असलेला आढळून आला. यावर पोलीसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे २०० रुपये किमतीचा एका धारदार कोयता आढळून आला. घातक हत्यार बाळगण्यावर बंदी असताना देखील आरोपीने स्वत:जवळ कोयता बाळगल्याने पोलिसांनी त्याला कोयत्यासह अटक केली. चिखली पोलीस अधिक तपास करत आहेत.