मुंडे सायबांचं नाव घेऊ नका; पंकजा मुंडेंसमोर खासदार गांधींना कार्यकर्त्यांचा दम  

0
1462

 अहमदनगर, दि. २ (पीसीबी) – खासदार दिलीप गांधी आणि राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यामध्ये नगरमध्ये चांगलीच शाब्दीक खडाजंगी झाली. तुम्ही मुंडे सायबांचे नाव घेऊ नका, असे मुंडे समर्थकांनी खासदार दिलीप गांधी यांना खडे बोल सुनावले.  अहमदनगर महापालिकेच्या प्रचारसभेत  पंकजा मुंडेंच्या समोरच हा  प्रकार घडला. यामुळे काहीकाळ येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

तुम्ही केवळ आश्वासने देता. विकासकामे काहीही करत नाही.  गेली १० वर्ष तुम्ही नगरमध्ये फिरकलेसुद्धा नाहीत. कोणत्याही  कामाचा पत्ता नाही, नुसती मोठी-मोठी आश्वासने तुम्हाला देता येतात, अशा शब्दात कार्यकर्त्यांनी गांधी यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचला. त्यानंतर मुंडे समर्थकांच्या  आक्रमक पवित्र्यामुळे खासदार दिलीप गांधी यांनाही संताप अनावर झाला. त्यांनी आक्रमक होत विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांनी फटकारले.

गांधी म्हणाले की, आम्हाला माहित आहे तुम्हाला काय लागते. कोणाच्या पोटात काय दुखत आहे, हे आम्हाला माहिती आहे. खासदारांनी गटारीचे काम करायचे का? असा सवाल करून प्रत्युत्तर दिले.