चिखलीतील तरुणीचे कपडे बदलतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर केले व्हायरल; तरुणा विरोधात गुन्हा

0
2927

चिखली, दि. ३० (पीसीबी) – तरुणीचे कपडे बदलतानाचे फोटो आणि व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली. ही घटना २०१३ ते २४ नोव्हेंबर २०१८ या कालावधीमध्ये चिखली पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या एका तरुणीसोबत घडली.

याप्रकरणी पिडित तरुणीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, टी. अश्विन (रा. चेन्नई, तामिळनाडू) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१३ ते २४ नोव्हेंबर २०१८ या कालावधीमध्ये आरोपी अश्विन याने पीडित तरुणीला लिव्ह इन रिलेशनशिप ठेवण्यास भाग पाडले. त्यानंतर तरुणीचे अश्लील फोटो मोबाईलमध्ये काढले. तसेच कपडे बदलतानाचे व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली.लोकँन्टो, एक्स हॅमस्टर व इतर वेबसाइटवर फोटो व्हायरल करून पीडित तरुणीची बदनामी करत तिचा विनयभंग केला. पोलिस निरीक्षक मसाजी काळे अधिक तपास करत आहेत.