चिंचवड येथे देणेकऱ्यांनी पैशांसाठी तगादा लावल्याने दोघा बहिणींनी पिले विष; एकीचा मृत्यू

0
545

चिखली, दि. ११ (पीसीबी) – देणेकऱ्यांनी पैशांसाठी लावलेल्या तगाद्याला कंटाळून दोघा सख्या बहिणींनी विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत एकीचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. ही घटना कृष्णानगर, चिंचवड येथे घडली.

मंगल गोकूळ नार्वेकर (वय ६२) आणि अलका राजू बाबर (वय ४५, दोघीही रा. जीमगेश बिल्डिंग, कृष्णानगर, चिंचवड) असे विष प्राशन केलेल्या दोघा सख्या बहिणींची नावे आहेत. त्यातील वृध्द मंगल नार्वेकर यांचा रविवारी (दि.१०) उपचार दरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगल आणि अलका या दोघीही सख्या बहिणी आहेत. काही दिवसांपूर्वी काही देणेकऱ्यांनी त्यांच्याकडे पैशांसाठी तगादा लावला होता. या तगाद्याला कंटाळून वृध्द मंगल आणि अलका या दोघींनी बुधवार (दि.६ मार्च ) रोजी विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या दोघींना तातडीने पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी मंगल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलिस तपास करत आहेत.