चिंचवड पोलिसांनी ३ लाख १० हजारांच्या ऐवजासह दोघांना केले अटक

0
555

चिंचवड, दि. १० (पीसीबी) – लॅपटॉप आणि मोबाईल चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना ३ लाख १० हजारांच्या चोरीच्या ऐवजासह चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.

संदेश प्रभाकर पाटोळे (वय २०), प्रविण सुरेश बोरसे (वय २९, दोघे रा. बिजलीनगर चिंचवड) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. त्यांच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संदेश आणि प्रवीण दोघेही नोकरी करतात. पोलिसांना त्यांच्यावर संशय आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. पोलिसांनी त्यांच्याजवळील बॅगेची झडती घतली असता त्यामध्ये एक लॅपटॉप आणि आठ मोबाईल फोन आढळून आले. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी मौजमजेसाठी आकुर्डी, वाल्हेकरवाडी, चिंचवड या भागातून दुचाकीचा वापर करुन घरातून, गाडीच्या डिक्कीतून असे एकूण १८ मोबाईल चोरल्याचे कबुल केले. तपासादरम्यान आरोपींकडून २६ चोरीचे मोबाईल एक लॅपटॉप , गुन्ह्यात वापरेलेली दुचाकी असा एकूण ३ लाख १० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई वरीष्ठ पोलीस निरीक्षक भिमराव शिंगाडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्‍वजीत खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, पोलीस उपनिरीक्षक डिगे, पोलीस कर्मचारी पांडुरंग जगताप, गोकावी, राजेंद्र शिरसाट, विजयकुमार आखाडे, शेलार, हृषीकेश पाटील, अमोल माने, पंकज बदाने, गोविंद डोके, माळी यांच्या पथकाने केली.