चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघात सीएम चषक रांगोळी व चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
866

चिंचवड, दि. २६ (पीसीबी) – चिंचवड आणि पिंपरी या दोन विधानसभा मतदारसंघात सीएम चषक रांगोळी व चित्रकला स्पर्धा उत्साहात पार पडली. दोन्ही विधानसभा मतदारसंघात प्रत्येक प्रभागात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत ५ हजारहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला.

भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा घेण्यात आल्या. चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघांमध्ये ठिकठिकाणी उद्योजक आणि माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या हस्ते रांगोळी व चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. आमदार जगताप यांनी स्वतः कार्यक्रमाची व स्पर्धेची पाहणी केली.

स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी गालिचे, ठिपक्यांची रांगोळी, पेंटेत रांगोळी, बेटी बचाव बेटी पढाओ रांगोळी, सेव वॉटर, वृक्षसंवर्धन रांगोळी अशा अनेक प्रकारच्या रांगोळ्या काढून सामाजिक जागृती केली. चिंचवड आणि पिंपरी या दोन्ही विधानसभा मतदारसंघांतील प्रत्येक प्रभागाचे सर्व नगरसेवक, स्वीकृत सदस्य आणि भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी स्पर्धा घेऊन लहानथोरांना एक वेगळे व्यासपीठ मिळवून दिले. महिलांना, लहान मुलांना व मुलींना रांगोळी काढताना व चित्र काढताना एक वेगळाच आनंद अनुभवायला मिळाला. प्रभाग स्वीकृत सदस्य विनोद तापकीर, अक्षय घोळवे, शीतल घोळवे, संतोष अडागळे, लवलीना कसबे यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले.