चिंचवडमध्ये मार्क कमी पडल्याच्या नैराष्यातून सहावीतील विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न

0
581

चिंचवड, दि. २२ (पीसीबी) – परिक्षेत मार्क कमी पडल्याच्या नैराष्यातून इयत्ता सहावीच्या वर्गात शिकणारी १२ वर्षीय विद्यार्थिनीने शाळेच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना आज (सोमवार) त्रिवेणीनगर येथील सरस्वती विद्यामंदिर या शाळेत घडली.

प्राप्त माहितीनुसार, जखमी १२ वर्षीय विद्यार्थिनी त्रिवेणीनगर येथील सरस्वती विद्यामंदिर या शाळेत इयत्ता सहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. आज तीचा निकाल होता. यामुळे तिचे पालक शाळेत आले होते. यावेळी शिक्षकांनी तिला यंदाच्या परिक्षेत कमी मार्क पडल्याचे तिच्या पालकांना सांगितले. यावर नैराष्य आलेल्या १२ वर्षीय विद्यार्थिनीने शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे. तिला एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.