चिंचवडगावात सीएम चषक रांगोळी व चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
837

चिंचवड, दि. ३० (पीसीबी) – चिंचवडगाव प्रभाग क्रमांक १८ मध्ये सीएम चषक रांगोळी व चित्रकला स्पर्धा उत्साहात पार पडली. प्रभागस्तरावर घेण्यात आलेल्या या स्पर्धेत ५०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला.

यावेळी चिंचवडदेवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, माजी आमदार रामभाऊ गुंडीले, चिंचवडगाव जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत पारखी, प्रयास महिला ग्रूपच्या अध्यक्षा माधुरी कवी व भाजयुमोचे प्रदेश सदस्य सचिन आरडे यांच्या हस्ते रांगोळी व चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

तसेच स्पर्धेनंतर प्रत्येक सहभागी खेळाडूंना महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांचे स्वाक्षरी केलेले प्रशस्तीपत्र व बक्षीसे पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, टाटा मोटोर्स युनियनचे माजी अध्यक्ष शिवाजीराव शेडगे आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

यावेळी संयोजक नगरसेवक अॅड. मोरेश्वर शेडगे, राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, माजी नगरसेविका  कांताताई मोंढे, प्रभाग स्वीकृत सदस्य विठ्ठल भोईर, जेष्ठ नेते रविंद्र देशपांडे, भाजयुमो चे सरचिटणीस अजित कुलथे, काकडे पार्क सहकारी सोसायटीचे सचिव राजन पाटील, स्पर्धा समन्वयक संतोष निंबाळकर, भाजपा चिंचवडगाव प्रभाग अध्यक्ष तुकाराम चौधरी, सचिन कुलकर्णी, राघूशेठ चिंचवडे, दादा देवचक्के, स्वप्निल गावडे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी गालिचे, ठिपक्यांची रांगोळी, पेंटेत रांगोळी, बेटी बचाव बेटी पढाओ रांगोळी, सेव वॉटर, वृक्षसंवर्धन रांगोळी अशा अनेक प्रकारच्या रांगोळ्या काढून सामाजिक जागृती केली.  महिलांना, लहान मुलांना व मुलींना रांगोळी काढताना व चित्र काढताना एक वेगळाच आनंद अनुभवायला मिळाला.

नगरसेवक अॅड. मोरेश्वर शेडगे यांनी प्रास्ताविक केले. अजित कुलथे यांनी सुत्रसंचालन तर नगरसेवक राजेंद्र गावडे यांनी आभार मानले.