अहमदनगरमध्ये शरद पवारांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जंन्सी लँडिंग

0
1223

अहमदनगर, दि.३० (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जंन्सी लँडिंग आज (रविवार) दुपारी साडेतीनच्या सुमारास नगरमध्ये करण्यात आले. हेलिकॉप्टरचा सीटबेल्ट बाहेर राहील्याने हॅलिकॉप्टर तातडीने उतरवल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या एमर्जन्सी लॅंडीगमुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.

एका शाळेच्या  शतक महोत्सवी सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी  शरद पवार नगर मध्ये  आले होते. यावेळी  शाळेच्या मैदानात कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांचे हेलीकॉप्टर उतरवण्यात आले.

शरद पवार हॅलीकॉप्टरमध्ये जाऊन बसले आणि काही वेळातच हॅलीकॉप्टरने टेकऑफ घेतला. आणि काही वेळातच त्याचे पुन्हा लॅंडीग झाले. दरम्यान पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.  सुरूवातीला गोंधळ उडाला.  मात्र, हे प्रकरण गंभीर नसल्याचे समजताच साऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. सीटबेल्टचा काही भाग दरवाज्याच्या बाहेर असल्याचे हॅलीकॉप्टरने टेक ऑफ घेतल्यानंतर पायलटच्या लक्षात आले. त्यानंतर पाच ते दहा मिनिटांत हॅलीकॉप्टरचे एमरजन्सी लॅंडीग करण्यात आले.