चाकूसह संसदेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात; सीआरपीएफच्या जवानांमुळे टळला अनर्थ

0
520

दिल्ली, दि. २ (पीसीबी) – चाकूसह संसदेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला सीआरपीएफच्या जवानांनी ताब्यात घेऊन दिल्ली पोलिसांच्या हवाली केले आहे. ही घटना आज (सोमवार) सकाळच्या सुमारास संसदेच्या गेट क्रमांक १ येथे घडली.

सागर इसा (रा. लक्ष्मीनगर, दिल्ली) असे या ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून त्याला संसद पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.

तो संसदेत कशासाठी आला होता, चाकू घेऊन संसदेत प्रवेश करण्याचा त्याचा उद्देश काय, याबाबतही काही समजू शकलेले नाही. दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्या या तरुणाची संसंद पोलीस ठाण्यात कसून चौकशी सुरु आहे.