चाकण येथील वात्सल्य शिक्षण संस्थेत अल्पवयीन विद्यार्थीनीचा छळ

0
876

चाकण, दि. ४ (पीसीबी) – एका १६ वर्षी अल्पवयीन विद्यार्थीनीला शाळेच्या शिक्षकांनी बांधुन ठेवत मारहाण करुन डोक्यात, हातापायावर आणि कपाळावर चटके दिले. तसेच तिला वेळोवेळी जेवणातून झोपेचे औषध देत छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना जुन २०१८ ते फेब्रुवारी २०१९ दरम्यान चाकण येथील वात्सल्य शिक्षण संस्थेत घडली.

याप्रकरणी पिडित मुलीच्या आईने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विलास देवतरसे, वैशाली देवतरसे आणि रेवन शाळेच्या केअरटेकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ३८ वर्षीय महिलेने त्यांच्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला शिक्षण आणि संगोपनासाठी देहुगाव येलवाडी रोड येथील वात्सल्य शिक्षण संस्थेत दाखल केले होते. मात्र जुन २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत आरोपी विलास देवतरसे, वैशाली देवतरसे आणि रेवन शाळेच्या केअरटेकर या तिघांनी मुलीचा छळ केला. तिला बांधुन ठेवत मारहाण करुन डोक्यात, हातापायावर आणि कपाळावर चटके दिले. तसेच तिला वेळोवेळी जेवणातून झोपेचे औषध देऊन त्रास दिला. या प्रकरणी पिडित मुलीच्या आईने चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, शाळेचे शिक्षक विलास देवतरसे, वैशाली देवतरसे आणि रेवन शाळेच्या केअरटेकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक कठोरे अधिक तपास करत आहेत.