चाकणमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू

0
797

चाकण, दि. ७ (पीसीबी) – अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोन तरुणांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार (दि.५) रात्री साडेबाराच्या सुमारास म्हाळुंगे गावाच्या हद्दीतील ठाकरवस्ती एच.पी.कंपनीजवळील रस्त्यावर घडली.

विकास रामनाथ शिंदे (वय २७, रा. ए/३, ऐश्वर्य आंगण, चाकण) आणि प्रविण शिवनारायण मिश्रा (वय ३१, रा. विशाल पार्क, चाकण) असे अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस प्रकाश शिंदे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार रात्री साडेबाराच्या सुमारास म्हाळुंगे गावाच्या हद्दीतील ठाकरवस्ती एच.पी.कंपनीजवळील रस्त्यावरुन विकास आणि प्रविण हे दोघे त्यांची दुचाकी (क्र. एमएच/१४/सीझेड/२३८२) वरुन जात होते. यावेळी अज्ञात वाहन चालकाने त्यांना जोरदार धडक दिली. त्यामध्ये विकास आणि प्रविण या दोघांचा जागीच मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक कठोरे आरोपी वाहन चालकाचा शोध घेत आहेत.