घरफोडी करून कुलूप जैसे थे लावून चोरटा पसार

0
186

दिघी, दि. ५ (पीसीबी) – अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरफोडी केली. त्यानंतर कुलूप जैसे थे लावून चोरटा पळून गेला. ही घटना दिघी येथे 3 मे रोजी उघडकीस आली.

याप्रकरणी एका महिलेने बुधवारी (दि. 4) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर 28 एप्रिल ते 3 मे या कालावधीमध्ये बंद होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घराचे कुलूप लोखंडी टॉमीच्या सहाय्याने तोडून घरात प्रवेश केला. घरातील ड्रॉवरमध्ये ठेवलेले 31 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. चोरी करून परत जाताना चोरट्याने प्रेस लॉकचे तोडलेले ते कुलूप पुन्हा घराला लावले. दिघी पोलीस तपास करीत आहे.