गोव्यात राष्ट्रध्वज फडकवण्यापासून नौदलाला रोखलं, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी..

0
649

गोवा, दि. १३ (पीसीबी) -देशभरात स्वातंत्र्यदिनाविषयी उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. कोरोना काळात मोठे कार्यक्रम जरी होणार नसले तरी उत्साह कायम आहे. मात्र याच उत्साहावर आणि आनंदावर विरजण टाकणारी घटना गोव्यात घडली आहे. गोव्यातील वर काही लोकांनी भारतीय नौदलाला तिरंगा फडकवण्यापासून रोखलं आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचं वातावरण आहे, शिवाय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावतं यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.

शुक्रवारी संध्याकाळी गोव्यातील याठिकाणी ही घटना घडली आहे. तिरंगा फडकवण्याच्या कार्यकमाचा भारतीय नौदलाकडून सराव सुरू होता. तेव्हा काही लोकांनी त्यांना राष्ट्रध्वज फडकवण्यापासून रोखलं. शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नाराजी व्यक्त करत गोवा पोलिसांना कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ट्वीट करून नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की, ‘हे दुर्दैवी आणि लज्जास्पद आहे की St Jacinto बेटावरील काही व्यक्तींनी भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भारतीय नौदलाकडून राष्ट्रध्वज फडकवण्यावर आक्षेप घेतला आहे. मी याचा निषेध करतो आणि रेकॉर्डवर सांगू इच्छितो की माझे सरकार असे कृत्य सहन करणार नाही.’ते पुढे म्हणाले की, ‘मी भारतीय नौदलाला अशी विनंती केली आहे की त्यांनी त्यांच्या मुख्य योजनेप्रमाणेच पुढे जावे. त्यांना गोवा पोलिसांच्या पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले आहे. भारतविरोधी कारवाईच्या प्रयत्नांना पोलादी मुठीने सामोरे जावे लागेल. राष्ट्र नेहमीच प्रथम असेल.’