गोरगरिबांना समाधान देणारी शिवभोजन योजना – विजय वडेट्टीवार

0
581

महाराष्ट्र,दि.१(पीसीबी) – गोरगरिबांना समाधान देणारी शिवभोजन योजना आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. विजय वडेट्टीवार यांनी मयूर स्नॅक्स सेंटर या शिवभोजन केंद्रामध्ये जावून शिव भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी शिवभोजन योजनेच्या प्रतिसादानुसार व उत्तम नियोजनाला बघून भविष्यात आणखी अतिरिक्त थाळींची व शिवभोजन केंद्रांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले. यावेळी भोजनालयात उपस्थित ग्राहकांशी संवाद साधून पालकमंत्र्यांनी त्यांना याचा व्यवस्थित लाभ मिळतो काय? याची चौकशी केली.

दरम्यान, शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे हे वितरण होत असल्याचे त्यांनी समाधान व्यक्त केले. पालकमंत्री वडेट्टीवार यांना शिवभोजना संदर्भात विशिष्ट अ‍ॅपची माहिती सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी संजय राईंचवार यांनी दिली.