गोपीचंद पडळकर ढाण्यावाघ, त्यांनी बारामतीतून लढावे – मुख्यमंत्री

0
540

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – गोपीचंद पडळकर हा ढाण्यावाघ आहे. ढाण्या वाघाने जंगलाच्या वाघासारखे राहायचे असते. माझी अशी इच्छा आहे की, त्यांनी बारामतीतून उभे राहिले पाहिजे. जर तुमची सर्वांची अनुमती असेल तर मी पक्षाशी बोलतो आणि यावेळी बारामती आपण जिंकून दाखवू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीचे उमेदवार असलेले गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत  भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, गोपीचंद पडळकर यांना भाजपमध्ये प्रवेश देताना मला आनंद होत होत आहे.  त्यांनी बारामतीतून निवडणूक लढवावी अशी माझी इच्छा आहे.  जर तुमची सर्वांची अनुमती असेल तर मी पक्षाशी बोलतो आणि यावेळी बारामती आपण जिंकून दाखवू, असा विश्वास व्यक्त केला.