गुजरातमध्ये साप आणि वृध्द एकमेकांना चावल्याने दोघांचा मृत्यू

0
541

गुजरात, दि. ६ (पीसीबी) – सापाने दंश केल्याच्या रागातून एका वृध्दाने सापाचा चक्क सापाचा चावा घेतला. यामध्ये साप आणि वृध्द दोघांचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना गुजरातमधील अजन्वा या गावात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार (दि. ४ मे) रोजी अजन्वा गावातील ७० वर्षीय पर्वत गाला बारिया यांना सापाने दंश केला. सापाने दंश केल्यानंतर रागामध्ये त्यांनीही सापाचा चावा घेतला. तेथे उपस्थित असलेल्या एका नातेवाईकाने याची माहिती पर्वत यांच्या घरी दिली. कुटुंबियांनी मेलेल्या सापाला जाळले. त्यानंतर उपचारासाठी त्यांना जवळील लुनावडा रूग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना गोध्रा रूग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. पर्वत यांनी चार तास मृत्यूशी झुंज दिली मात्र, उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.