गावी जायच्या परवनगीसाठी भली मोठी रांग

0
501

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – गावी जाण्यासाठी पोलीस परवानगी आवश्यक आहे. ही परवानगी घेण्यासाठी शहरातील बहुतांश सर्वच पोलीस ठाण्यांबाहेर भली मोठी रांग लागली आहे.

ज्यांना आपल्या मूळगावी जायचे आहे अशा नागरिकांनी वैद्यकीय तपासणीसह पोलिसांकडे अर्ज करणे अनिवार्य आहे. पोलिसांकडून परवानगी मिळवण्यासाठी आजपासून नागरिकांचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. पाच किंवा त्यापेक्षा अधिक नागरिकांना एकत्रित माहिती पोलिसांकडे जमा करण्याबाबत नागरिकांना सूचना दिल्या आहेत. गावी जाणाऱ्यांची यादी पोलिसांकडे जमा करण्यासाठी सध्या पोलीस ठाण्याबाहेर मोठी रांग लागली आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील बहुतांश पोलीस ठाण्याबाहेर हे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी पोलिस सोशल डिस्टन्सिग ठेवण्याचे आव्हान करीत आहेत. मात्र काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वाधिक गर्दी चिखली पोलीस ठाण्याच्या बाहेर दिसून आली. याबाबत बोलताना चिखलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने म्हणाले, “सध्या नागरिकांचे अर्ज स्वीकारण्यात येत असून अधिक माहितीसाठी त्यांना नंतर बोलावण्यात येणार आहे.”