गाडीच्या डिक्कीतून पंचरत्न आणि रोकड चोरीला

0
196

वाकड, दि.३ (पीसीबी) : मोपेड दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवलेले पाच रत्ने आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी डिक्की उघडून चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. १) रात्री साडेनऊ वाजता डी कॅथ लॉन, वाकड येथे घडली.

गणेश शिवाजी बालवडकर (वय ३९, रा. बालेवाडी) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बालवडकर यांनी पुष्कराज, पाचू, मोती, माणिक, निमल अशी पाच रत्ने आणि रोख रक्कम असा एकूण ५६ हजारांचा ऐवज त्यांच्या मोपॉइड दुचाकीच्या डिक्कीत ठेवला होता. सोमवारी रात्री त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीमधून अज्ञात चोरट्यांनी रत्ने आणि रोख रक्कम डिक्की उघडून चोरून नेली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.