गडकरीजी, पालखी मार्गाकडे लक्ष द्या – सुप्रिया सुळे

0
606

मुंबई,दि.१९(पीसीबी) – गडकरीजी, महाराष्ट्राच्या भावविश्वात पालखी सोहळ्याला मोठे महत्त्व आहे. या सोहळ्यात अपघात घडणे खेदजनक आहे. पालखी मार्गाच्या रस्त्याचे चौपदरीकरण रखडले आहे. कृपया आपण वैयक्तिक लक्ष घालून पालखी मार्गाचे काम पुर्ण करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय वाहतूक आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना केली आहे.

पुण्याजवळच्या दिवेघाटात संत नामदेव महाराज कार्तिकी वारी पालखी सोहळ्याच्या दिंडीला अपघात झाला. त्यात संत नामदेव महाराजांचे १९ वे वंशज सोपान महाराज नामदास यांचा मृत्यू झाला. सोबत आणखी एका वारकऱ्याचा मृत्यु झाला. तर काही जण जखमी आहेत. या घटनेबाबतच सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत गडकरींना विनंती केलाी आहे.

दिवेघाटातील रस्त्याच्या स्थितीबाबत यापुर्वीच्या सरकारला वारंवार कळवलं आहे. मात्र हा घाट योग्य कठड्यांअभावी घातक झाल्याचेही सतत शासनाला सांगत होतो. घाटात श्री संत नामदेव महाराज यांच्या पालखी सोहळ्यात जेसीबी घुसून अपघात झाला यात रस्त्याच्या दुरवस्थेचाही मुद्दा दुर्लक्षित करता येणार नाहीस, असंही सुप्रिया सिळे म्हणाल्या आहे.