गजा मारणेच्या निमित्ताने शहरातील ‘३५ टोळ्या’ टार्गेट

0
3233

– मिरवणुकीमुळे संतापलेल्या पोलिसांनी काढली ‘कुंडली’; टोळ्या नेस्तनाबुत करण्यासाठी ‘ऍक्शन प्लॅन’ तयार

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – कुख्यात गुंड गजा मारणेने कारागृहातून सुटल्यानंतर पोलिसांच्या नाकावर टिच्चून जंगी मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीमुळे पोलिस चांगलेच सतापले आहेत. आता पोलिसांनी आक्रमक होऊन गजावर तुटून पडले. आगामी काळात गजाची ही मिरवणूक पिंपरी चिंचवड शहरातील सर्वच टोळ्यांना भोवणार आहे. पोलिसांनी ३५ टोळ्यांची कुंडली तयार केली आहे. या टोळ्यांचा कायमचा बंदोबस्त करायचा पोलिसांचा ऍक्शन प्लॅन देखील तयार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गुंड गजा मारणे याची १५ फेब्रुवारी २०२१ रोजी तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली. त्यानंतर गजाने स्वतःची जंगी मिरवणूक काढली होती. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोलनाक्यावर टोळक्यांने राडाही घातली. त्यामुळे पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयातील विविध पोलिस ठाण्यांतून मारणे टोळीवर तीन गुन्हे दाखल करण्यात आले. गजाने मिरवणुक काढून एक प्रकारे पोलिसांचा स्वाभिमान दुखावला. त्याच्या अशा वागण्याने पोलिस यंत्रणा हात धुवून त्याच्या मागे लागली. पिंपरी- चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी गजाची मिरवणूक गांभीर्याने घेत शहरातील सर्वच छोट्या-मोठ्या टोळ्यांची माहिती मागवली आहे. तसेच, या टोळ्यांनी ज्यांना त्रास दिला आहे. त्यांना विश्वास देऊन तक्रार देण्याचे आवाहन स्थानिक पोलिस करीत आहे. एकंदरीतच टोळ्यांची नांगी ठेचण्यासाठी पिंपरी- चिंचवड पोलिस ऍक्शन मूड असल्याचे पाहावयास मिळत आहे.

शहरातील पाच मोठ्या टोळ्या
पिंपरी- चिंचवडच्या गुन्हेगारी विश्वात दबदबा असणाऱ्या बाळू वाघेरे, राकेश भरणे आणि प्रकाश चव्हाण या तीन प्रमुख टोळ्या होत्या. या व्यतिरिक्त शाम दाभाडे आणि रावण टोळीने देखील मागील काही वर्षात शहरात दहशत होती. मात्र, अलीकडे या पाचही टोळ्या अंडरग्राऊण्ड असल्याचे पाहावयास मिळत आहे.

    टोळीचे नाव – टोळी प्रमुख – पोलिस ठाणे
१) वाघेरे टोळी – बाळू बबन वाघेरे – पिंपरी
२) भरणे टोळी – राकेश पोपट भरणे – हिंजवडी
३) चव्हाण टोळी – प्रकाश लक्ष्मण चव्हाण – भोसरी
४) रावण साम्राज्य – अनिकेत अरुण जाधव – निगडी
५) काळभोर टोळी – सोन्या- उर्फ विवेक काळभोर – निगडी
६) महाकाली टोळी – राकेश ढोलकीया – देहोरोड
७) दाभाडे टोळी – शाम रामचंद्र दाभाडे – तळेगाव दाभाडे
८) हस्तोडिया टोळी – अरुण मुकेश हस्तोडिया – देहूरोड
९) राठोड टोळी – देवानंद राठोड – आळंदी
१०) तांगडे टोळी – गणेश शंकर तांगडे – तळेगाव एमआयडीसी
११) शिंदे टोळी – हनुमंत भगवान शिंदे – देहूरोड
१२) टकले टोळी – मयूर उर्फ बंटी टकले – तळेगाव दाभाडे
१३) धनवे टोळी – अविनाश बाळू धनवे – दिघी
१४) पवार टोळी – प्रशांत उर्फ शिंगरू पवार – देहूरोड
१५) अलकुंडे टोळी – राहुल उत्तम अलकुंडे – देहूरोड
१६) गुजर टोळी – संतोष कांतीलाल गुजर – चाकण
१७) खान टोळी – शाहरुख युनूस खान – वाकड
१८) पांडे टोळी – बाबा पांडे- भोसरी
१९) डोंगरे टोळी – महेश किरण डोंगरे – भोसरी
२०) धरम्या टोळी – धर्मेश शामकांत पाटील – पिंपरी
२१) मामा गॅंग – आकाश उत्तम रणदिवे – चिंचवड
२२) सांडभोर टोळी – प्रमोद सोपान सांडभोर – तळेगाव दाभाडे
२३) मुऱ्हे टोळी – योगराज उर्फ बिट्या बाळासाहेब मुऱ्हे – तळेगाव दाभाडे
२४) शेख टोळी – साबीर समीर शेख – देहूरोड
२५) बुग्गी टोळी – बुग्गी उर्फ मोबीन सलीम शेख – देहूरोड
२६) लांडगे टोळी – ज्ञानेश्वर रामदास लांडगे- एमआयडीसी भोसरी
२७) गोल्डन ग्रुप – साहिल उर्फ खाऱ्या तानाजी जगताप- निगडी
२८) बीवाय टोळी – बॉबी उर्फ सुरेश विलास यादव – निगडी
२९) गवळी गॅंग – आनंद उर्फ दाद्या राजू गवळी – निगडी
३०) कोरबू टोळी – मोहम्मद उर्फ मम्या मेहबूब कोरबू – निगडी
३१) गाढवे टोळी – अवधूत जालिंदर गाढवे – दिघी
३२) नाणेकर टोळी – बाबुशा उर्फ बाबाजी ज्ञानेश्वर नाणेकर – चाकण
३३) सोप्या गॅंग – स्वप्नील उर्फ सोप्या संजय शिंदे – चाकण
३४) हिंगे टोळी – लक्ष्मण उर्फ दाद्या पिराप्पा हिंगे – वाकड
३५) चौधरी टोळी – अनिकेत अर्जुन चौधरी – वाकड