ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या स्वागताकरीता मद्यधुंद पार्ट्यांमध्ये विनापरवाना गाणी वाजवण्यास बंदी

0
355

मुंबई, दि.२४ (पीसीबी) – ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या स्वागताकरीता पार्ट्यांच्या आयोजनासाठी विविध हॉटेल्स, पब्ज आणि रेस्तराँ सज्ज झाले आहेत. मात्र, अशा ठिकाणी होणाऱ्या मद्यधुंद पार्ट्यांमध्ये विनापरवाना गाणी वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे. काल सोमवारी मुंबई हायकोर्टाने हे आदेश दिले आहेत.

हायकोर्टाने आपल्या आदेशात म्हटले की, शहरातील हॉटेल्स, पब्ज आणि रोस्तराँमध्ये ख्रिसमस आणि नव्या वर्षांच्या निमित्तानं आयोजित पार्ट्यांमध्ये फिल्मी आणि गैरफिल्मी गाणी परवाना शुल्क व सुरक्षित कॉपीराईट परवानग्या दिल्याशिवाय वाजवता येणार नाहीत. कोणत्याही प्रकारची गाणी वाजवण्यापूर्वी आयोजकांनी त्यासाठीचे परवाना शुल्क भरून ‘फोनोग्राफिक परफॉर्मन्स’ची (पीपीएल) परवानगी घ्यावी