खासदार उदयनराजेंची काळजी घ्यायला आम्ही आहोत – शरद पवार

0
1894

सातारा , दि. २६ (पीसीबी) – साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याविषयी  माध्यमांनी चिंता करू नये. त्यांची काळजी घ्यायला आम्ही आहोत, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदयनराजेंची पाठराखण केली आहे.  उदयनराजे यांची भाजपशी वाढती जवळीक वाढली आहे, याप्रश्नावर शरद पवार म्हणाले, माध्यमांनी त्याची चिंता करू नये, त्याची काळजी घ्यायला आम्ही आहोत.

पाटणमध्ये राष्ट्रवादीचा जाहीर मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी शरद पवार बोलत होते.

यावेळी मराठा आरक्षण न्यायालयात टिकण्याबाबत शरद पवार यांनी शंका व्यक्त केली आहे. राज्यात भाजप सरकारकडून मराठा आरक्षण दिले गेले आहे, ते न्यायालयात किती टिकेल याबाबत पवारांनी शंका व्यक्त केली आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी १०२ व्या घटना दुरुस्तीतील तरतुदीचा अभ्यास करण्याची गरज आहे, असे म्हटले आहे. या तरतुदीतील मुदे सरकारने लक्षात घेतले नसावेत, अशी शंका पवार यांनी यावेळी उपस्थित केली आहे.