खड्डे, खोदाई आणि राडारोडा अशा प्रकारच्या वारंवार होणाऱ्या त्रासाला जबाबदार अधिकाऱ्यांना दंड आकारा

0
321

पिंपरी, दि. १९(पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे.नागरिकांना खड्डे वारंवार होणारी खोदाई , राडारोडा आणि धूळ अशा समस्यांचा त्रास नाहक सहन करावा लागतो.नागरिकांनी एखादा नियम मोडल्यास ज्याप्रमाणे त्यांना दंड आकारला जातो. त्याप्रमाणे खड्डे , खोदाई आणि राडारोडा अशा प्रकारच्या वारंवार होणाऱ्या त्रासाला जबाबदार ठरणारे अधिकाऱ्यांना देखील दंड आकारला जावा, अशी उपरोधिक मागणी भाजपा नगरसेवक तुषार कामठे यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 26 चे महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक तुषार कामठे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा प्रकारच्या मागणीची पोस्ट केली आहे. ही पोर पोस्ट शहरात चर्चेचा विषय बनली आहे.तुषार कामठे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक मिळकत कर, पाणी पट्टी यासह विविध कर महापालिकेला वेळेवर भरत असतात. त्या तुलनेत महापालिका प्रशासन करदात्यांना मुलभूत सुविधा देण्यात अनेक वेळा असमर्थ ठरत आहे. याचा त्रास करदात्या नागरिकांना होत आहे .नागरिकांनी नियम मोडल्यास त्यांना दंड आकारला जातो. त्याप्रमाणे महापालिका हद्दीत रस्त्यावर खड्डे पडल्यास संबंधित जबाबदार अधिकाऱ्याला 20 हजार दंड, सिग्रल नादुरूस्त झाल्यास संबंधित जबाबदार अधिकाऱ्याला 10 हजार रुपये दंड आकारावा, अशी उपरोधिक मागणी कामठे यांनी केली आहे.

“नगरसेवक तुषार कामठे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात…
-रस्त्यावर खड्डे : संबंधित जबाबदार अधिकारी दंड : 20000
-अतिक्रमित फुटपाथ : संबंधित जबाबदार अधिकारी दंड: 20000
-रस्त्यावर अंधार : जबाबदार अभियंत्याला दंड : 25000
-रस्त्यावर कचरा पडून आहे : संबंधित जबाबदार अधिकारी, दंड : 25000
-रस्त्यावर विजेचे पोल नाहीत: संबंधित जबाबदार अधिकारी, दंड : 30000