खडसेंनी माझ्या कानात त्या व्यक्तीचं नाव सांगावे,”- गिरीश महाजन

0
467

मुंबई, दि.३ (पीसीबी) – भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यामुळेच तिकीट न मिळाल्याचा आरोप केला होता. त्यांच्या आरोपामुळे भाजपामध्ये खळबळ उडाली होती. खडसेंच्या आरोपावर गिरीश महाजन यांनी खुलासा केला आहे. खडसे यांना कुणीतरी चुकीची माहिती दिली आहे. त्यांनी जाहीरपणे त्या व्यक्तीचं नाव सांगण्यास नकार दिला असला, तरी त्यांनी माझ्या कानात त्या व्यक्तीचं नाव सांगावे,” असे आवाहन महाजन यांनी खडसे यांना केले आहे.