क्वात्रोची, अँडरसन राहुल गांधींचे मामा, म्हणून त्यांना अमेरिकेला पळवले – पंतप्रधान मोदी

0
692

भोपाळ, दि. २४ (पीसीबी) – बोफोर्स घोटाळ्यातील क्वात्रोची आणि भोपाळ गॅस दुर्घटनेला जबाबदार असलेला अँडरसन हे दोघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राहुल गांधी यांचे मामा होते. त्यामुळेच त्यांना खास विमानाने अमेरिकेला पळवून देण्यात आले, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  आज (शनिवार) केला. मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत मोदी बोलत होते.

भोपाळ गॅस दुर्घटनेला जबाबदार असलेल्या अँडरसनला माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी पळवून लावले. अँडरसन आणि क्वात्रोची या दोघांनाही लपून छपून अमेरिकेत पोहचवण्यात आले, असा शिवराज सिंह चौहान यांच्यावर आरोप करण्याआधी या दोघांबाबत आईला विचारा असाही खोचक सल्ला मोदी यांनी राहुल यांना दिला. बोफोर्स घोटाळा माझ्या मामानेच केला  आहे, हे  मध्यप्रदेशातील  लोकांना सांगा, असेही  मोदी यांनी म्हटले.

काँग्रेस नेते राज बब्बर यांनी मोदीँच्या आईबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. या विधानाला  मोदी यांनी यावेळी उत्तर दिले. माझ्या आईला राजकारणातील  ‘र’ देखील माहीत नाही. पूजा करणे, देवासमोर जप करत आपला वेळ घालवणे हीच तिची दिनचर्या आहे. माझ्याशी  सामना  करता येत नसल्यामुळे काँग्रेसने माझ्या आईलाही राजकारणात खेचले आहे, हे लाजिरवाणी आहे, अशी टीका मोदी यांनी यावेळी केला.