क्लासला जात असलेल्या मुलाला सिमेंटच्या विटांनी मारहाण

0
403

हिंजवडी, दि. ९ (पीसीबी) – क्लासला जात असलेल्या मुलाला रस्त्यात अडवून ‘तू मला त्या दिवशी शिव्या का दिल्या’ असे विचारत सिमेंटच्या विटांनी मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 8) दुपारी सूसगाव येथे घडली.

सौम्यजित लक्ष्मण साहू असे मारहाणीत जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत त्याची आई पार्वती लक्ष्मण साहू (वय 38, रा. सूसगाव, ता. मुळशी) यांनी शनिवारी (दि. 8) याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. स्वराज योगेश मुरकुटे (वय 19), आदित्य खणसे (वय 20, दोघेही रा. सूसगाव) आणि त्यांचे दोन साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पार्वती यांचा मुलगा सौम्यजित हा शनिवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास क्लाससाठी जात होता. तो पारखेवस्ती येथे आला असता त्याला आरोपींनी रस्त्यात अडविले. “तू मला त्या दिवशी शिव्या का दिल्या होत्या’, अशी विचारणा करीत आरोपींनी त्यास सिमेंटच्या विटांनी मारहाण करून जखमी केले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.