क्रिकेटर मोहम्मद शामीच्या पत्नीला पोलिसांनी घेतले ताब्यात

0
473

सहसपूर, दि. २९ (पीसीबी) – पती मोहम्मद शामीच्या घरात घुसून सासूसोबत भांडण केल्याने हसीन जहाँला रविवारी रात्री उशीरा अमरोहा पोलिसांनी ताब्यात घेतले.  

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी मोहम्मद शामीची पत्नी हसीन जहाँ मुलीसह सासरी सहसपूर अलीनगरला घरी पोहचली. हसीन घरी पोहचताच सासू आणि दीर यांच्यासोबत तिचे शाब्दिक भांडण झाले. शामीच्या आईने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. या गोंधळाची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळावर पोहचले. पोलिसांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. वाद मिटण्याची शक्यता दिसत नसल्यामुळे पोलिसांनी तेथून हसीनला घेऊन गेले. सध्या हसीन जहाँवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

आज (सोमवार) सकाळी या प्रकरणाला नवे वळण मिळाले. हसीन जहाँने माध्यमांशी बोलताना अमरोहा पोलिसांवर गंभीर आरोप लगावले. २०-२५ पोलिसांनी मुलीसह मला गेल्या काही तासांपासून ताब्यात घेतले आहे. उपाशी ठेवल्याचा आरोपही हसीनने केला आहे. मोहम्मद शामीची असलेली ओळख आणि पैसेमुळे पोलीस त्रास देत असल्याचा आरोप हसीनने केला आहे.