कोश्यारींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यास रोहित पवारांच्या वडिलांचं नकार

0
279

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – कृषी विभागाकडून देणाऱ्या येणाऱ्या पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार बारामती अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांना जाहीर झाला. पण राजेंद्र पवारांनी राज्यपालांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे. राजेंद्र पवार हे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांचे वडील आहेत. ही बातमी लोकमतने दिली आहे. या कार्यक्रमालाच जाणार नसल्याची भूमिका राजेंद्र पवार यांनी घेतली आहे.

राजेंद्र पवार म्हणाले, या सोहळ्याला न जाण्यामागे अनेक कारणे आहेत. “गेल्या काही दिवसात महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत. फुले दांपत्याविषयी खालच्या पातळीवर जाऊन मते मांडली जात आहेत. त्यांच्याविषयी खालच्या पातळीवर जाऊन मत मांडणारे, महाराष्ट्राचा इतिहास माहित नसणारे लोक महत्वाच्या पदावर आहेत.”
“गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात अराजकता निर्माण केली जात आहे. याला खतपाणी घालणाऱ्यांच्या हस्ते मी हा पुरस्कार कसा स्वीकारावा? त्याऐवजी एखाद्या कृषी कार्यालयात अथवा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळाला असता तर तो मी स्विकारला असता, अशी भूमिका राजेंद्र पवार यांनी स्पष्ट केली आहे.”