कोविड रुग्णालयात बेड उपलब्ध करून देण्याच्या गुन्ह्यात महिला डॉक्टरला अटक

0
314

पिंपरी,दि. 5 (पीसीबी):पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ऑटो क्लस्टर येथील कोविड रुग्णालयात बेड उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकाकडून पैसे घेतल्या प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला तीन डॉक्‍टरांना अटक केली होती. या प्रकरणाच्या तपासात एका महिला डॉक्‍टरचे नाव उघड झाले असून पोलिसांनी तिलाही अटक केली आहे.

डॉ. जोत्स्ना दांडगे असे अटक करण्यात आलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. डॉ. प्रवीण जाधव, डॉ. शशांक राळे आणि डॉ. सचिन कसबे या तीन डॉक्‍टरांना पिंपरी पोलिसांनी यापूर्वी अटक केली आहे. त्यांना 6 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या ऑटो क्लस्टर येथील कोविड रुग्णालयात बेड उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकाकडून पैसे घेतल्या प्रकरणाचा तपास करीत असताना पोलिसांनी तीन लाख 10 हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे.

तसेच, या गुन्ह्यात डॉ. ज्योत्स्ना दांडगेचा देखील सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी तिलाही बेड्या ठोकल्या आहेत.