कोरोनामुळे मृत्यू झालेल्या वडिलांच्या चितेत मुलीने उडी

0
494

जयपूर, दि. ६ (पीसीबी) : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोना काळात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या वडिलांच्या चितेत मुलीने उडी घेतल्याची घटना घडली आहे. यात 30 वर्षीय महिला गंभीररित्या भाजली आहे. राजस्थानमधील बाडमेरमध्ये ही घटना समोर आली आहे.

राजस्थानमधील बाडमेरमध्ये रॉय कॉलनीमध्ये राहणाऱ्या जयराम दास यांना कोरोनाची लागण झाली होती. काही दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची संपूर्ण तयारी करण्यात आली. जयराम दास यांच्या चितेला मुखान्गी देण्यात आला. मात्र काही सेकंदाने 30 वर्षीय मुलगी चंद्रकला हिनेही चितेमध्ये उडी घेतली.

प्रकृती गंभीर
यानंतर तिची मोठी बहिण पिंकी हिने तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत चंद्रकला 60 टक्के भाजली होती. यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. चंद्रकला 60 टक्के भाजल्याने तिची प्रकृती नाजूक आहे. दरम्यान या संपूर्ण घटनेमुळे जिल्हावासियांचे मन सुन्न झाले आहे.

सार्वजनिक स्माशनभूमीत अंत्यसंस्कार
वर्मारमधील पोलिस स्टेशनचे एसएचओ प्रेम प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी चारच्या सुमारास जयराम दास यांच्या चितेला अग्नी देण्यात आला. यावेळी चंद्रकला यांनी चितेत उडी घेतली. यावेळी त्यांच्या बहिणीने तिला मागे ओढण्याचा प्रयत्न केला. पण ती 70 टक्के भाजली होती. या महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. या कोविड मृतांसाठी निर्धारित करण्यात आलेल्या जागेऐवजी व्यक्तीचे सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत होते.