“कोरोनाच्या बहाण्याने श्रमिकांचं शोषण करु नका”

0
348

नवी दिल्ली, दि‌.१२(पीसीबी) – कोरोनाच्या बहाण्याने श्रमिकांचं शोषण करु नका, असं वक्तव्य काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलं आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे, या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या बहाण्याने श्रमिकांचे शोषण नको, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. काही राज्यांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रमिकांच्या हितास बाधा आणणारे निर्णय घेतले जात आहेत. कोरोनाच्या बहाण्याने श्रमिकांचे शोषण केले जाऊ नये, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. त्यांनी यासंदर्भात राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे.

अनेक राज्यांकडून कामगार कायद्यात दुरुस्ती केली जात आहे. कोरोनाचे संकट गंभीर आहे व आपण सर्व त्याविरोधात लढत आहोत. मात्र कोरोनाच्या आडून कोणी मानवी हक्कांचे उल्लंघन करू नये, तसेच कामगारांची पिळवणूक करून त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करू नये. कामगारांसंबंधी जी मूलभूत तत्त्वे आहेत त्यात कोणालाही तडजोड करता येणार नाही, त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.