“कोरोनाची अफवा पसरवली तर कारवाई होणार”

0
574

मुंबई,दि.२(पीसीबी) – कोरोनाची अफवा पसरवली तर कारवाई होणार, असं सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. मांसाहार केल्यामुळे कोरोना व्हायरस ची लागण होऊ शकते, या अफवे मुळे कुक्कुटपालन क्षेत्राची आणि शेतकऱ्यांचे सुद्धा प्रचंड नुकसान झाले आहे.

पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी मान्य केले की ‘या अशा अफवांमुळे कुकूटपालन क्षेत्राचे नुकसान झाले आहे. तसेच व्हाट्सअपवर ही खोटी माहिती कुणी पसरवली आहे याचा शोध घेण्याबाबत पशुसंवर्धन यांनी आयुक्तांनी आठ दिवसांपूर्वी सायबर क्राईम विभागाकडे तक्रार दाखल केल्याचेही त्यांनी सभागृहाला सांगितले. खोडसाळपणा केला तर त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सरकारतर्फे सायबर क्राईम विभागांना सांगण्यात येईल असे सांगितले.

विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग मार्फत होणारी तपासणी नीट होत नसल्याची तक्रार काँग्रेसचे आमदार अमिन पटेल यांनी केली. त्यावर आपण स्वतः त्या ठिकाणी भेट देऊ, असे टोपे म्हणाले.