कोरोनाग्रस्थ रुग्णांसाठी घर ते दवाखाना मोफत रिक्षा सेवा, वाचा सविस्तर…

0
310

रुपीनगर,दि.२५(पीसीबी) – करोना सारख्या महामारी राज्यात धुमाकूळ घालत असल्यामुळे मा.खासदार शिवसेना उपनेते संपर्क प्रमुख शिवाजीराव आढळराव पाटील आणि भोसरी विधानसभा सर्व पदाधिकारी.यांच्या मार्गदर्शना खाली भोसरी विधानसभा समन्वयक श्री दादासाहेब नरळे यांच्या मध्यमातुन कोविड-१९ असलेल्या कोरोनाग्रस्थ रुग्णांसाठी घर ते दवाखाना मोफत रिक्षा सेवा सुरु करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा समन्वयक आबा भोसले, मा. विभाग प्रमुख सुखदेव(आप्पा) नरळे , शिवसेना कार्यकर्ते नामदेव नरळे,विभागप्रमुख नितीन बोडें, युवासेना दादा सामगीर, माजी शाखा प्रमुख अभिमन्यू सोनसाळे, पांडुरंग कदम, सतीश कंठाळे, मा.उपविभागप्रमुख नागेश अजुरे, नाना चौधरी. घारजाई माता ॲाटो रिक्षा स्टॅडचे सदस्य तुषार काजळे, महेश काजळे, आसाराम ढाकणे, सुभाष कातोरे, दत्त रुपानेर, विनोद गायकवाड, बाबा क्षीरसागर, सतीश शेवाळे, लक्ष्मण पवार, ढोले पाटील हे सर्व उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे नियोजन :- शिवसेना भोसरी विधान सभा समन्वयक दादासाहेब सुखदेव नरळे यांनी केले होते. कोविड ग्रस्थ रुग्णांसाठी प्राभाग क्र १२ मधून १० रिक्षांचे नियोजन केले.