कोणी कितीही कोलांटउड्या मारूद्या, जेवढे राहिलो तेवढे मेरिटमध्ये येवू – सुप्रिया सुळे

0
466

पुणे, दि. ५ (पीसीबी) – राजकारणात सध्या सुरू असलेल्या ‘इनकमिंग’ आणि ‘आऊटगोईंग’मुळे विरोधी पक्षात खलबते सुरू आहे. सलग ४५ दिवस केलेल्या अभ्यासानंतर माझा मुलगा मेरिटमध्ये येतो. तर ‘नाना देवकाते’ आपल्याकडेही तेवढेच दिवस आहेत. त्यामुळे आपणही मेरिटमध्ये येऊ शकतो, असा विश्‍वास खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्षांकडे पाहत व्यक्‍त केला.

कोणी कितीही कोलांटउड्या मारल्या, मारूद्या, जेवढे राहिलो तेवढे मिळून आपल्याला आगामी विधानसभा निवडणुकीत एकजुटीने मेरिटमध्ये यायचे आहे, असे सूचक वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले. जिल्हा परिषदेच्या एका कार्यक्रमादरम्यान खासदार सुप्रिया सुळे ‘शिक्षण पद्धती’ या विषयावर यावेळी शिक्षकांना मार्गदर्शन केले.

पुणे जिल्ह्यातही राष्ट्रवादी काँग्रेसचे काही पदाधिकारी भाजप आणि शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे कोण, कधी, कुठे, कशी उडी मारेल याची शाश्‍वती नाही, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटल आहे.

माझ्या मुलाला गणित विषयात केवळ ४० ते ५० गुण पडत होते. बोर्डाच्या परीक्षेला ४५ दिवस राहिले असताना, त्याच्याच शाळेतील शिक्षिकेने त्याला दिलेल्या शिकवणीमुळे तो ‘मेरीट’मध्ये आला. यश मिळविण्यासाठी केवळ तंत्रज्ञानाची नाही तर मेहनत, कार्यपद्धती आणि कार्यक्षमता महत्त्वाची आहे, असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.