कुख्यात डॉन अरुण गवळीला २८ दिवसांची फर्लो रजा मंजूर

0
489

नागपूर, दि. ९ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर कुख्यात डॉन अरुण गवळीची बुधवारी नागपूर मध्यवर्ती कारागृहातून फर्लोवर सुटका करण्यात आली. परिवाराला भेटण्यासाठी अरुण गवळीने फर्लोची मागणी केली होती. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अरुण गवळीला २८ दिवसांची फर्लो रजा मंजूर केली आहे.

अरुण गवळी कुटुंबातील सदस्यांना भेटण्यासाठी संचित रजा द्यावी, अशी मागणी अरुण गवळीने कारागृह प्रशासनाकडे केली होती. मात्र कारागृह प्रशासनाने तो अर्ज फेटाळल्याने गवळीने न्यायालयात धाव घेत संचित रजेसाठी अर्ज दाखल केला होता. ३० एप्रिलपासून गवळीची संचित रजा मंजूर करण्यात आली आहे. मात्र फर्लोचे नियम आणि अटींची प्रक्रिया पूर्ण करायला अतिरिक्त कालावधी लागत असल्याने गवळी काल फर्लोच्या रजेवर गेला. यापूर्वीही गवळीला ‘पॅरोल’ किंवा ‘फर्लो’वर सोडण्यात आले आहे. शिवसेना नगरसेवक कमलाकर जमसांडेकर यांच्या हत्येची शिक्षा सध्या अरुण गवळी भोगत आहे.