किरकोळ कारणावरून सुरक्षा रक्षकाला मारहाण

0
276

पिंपळे गुरव, दि. ८ (पीसीबी) – किरकोळ कारणावरून दोघांनी मिळून सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. ही घटना सोमवारी दि. सात सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास पिंपळे गुरव येथे घडली.

मनाजी नाना वरे वय 52 रा. पिंपळेगुरव असे मारहाण झालेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. त्यांनी याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चिराग जगताप रा. पिंपळे गुरव आणि एक सुरक्षारक्षक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे तीन सुरक्षारक्षकांसोबत भांडण झाले. त्यावरून एका सुरक्षारक्षकाने फिर्यादी यांना हाताने मारहाण केली. भांडण झालेल्या तिन्ही सुरक्षारक्षकांनी फिर्यादी यांच्या घरी जाऊन तक्रार केली. आरोपी चिराग याने फिर्यादी यांना काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दमदाटी केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.