रस्त्याने जाणाऱ्या मजुराला विनाकारण मारहाण चौघांवर गुन्हा दाखल

0
291

देहूगाव, दि. ८ (पीसीबी) – रस्त्याने जाणाऱ्या मजुराला चार जणांनी मिळून विनाकारण बेदम मारहाण केली. ही घटना सहा जून रोजी विठ्ठलवाडी देहूगाव येथे घडली. याबाबत चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जितू कैलास गायकवाड, सागर रामकृष्ण साठे, रोहन संतोष विटकर, रोहित चौधरी (सर्व रा. विठ्ठलवाडी, देहूगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत संतोष सखाराम भोसले (वय 40, रा. विठ्ठलवाडी देहूगाव) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष भोसले हे सहा जून रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास विठ्ठलवाडी येथील रस्त्याने घरी जात होते. त्यावेळी आरोपी रस्त्यावर आपसात भांडण करीत होते. त्यातील एकाने फिर्यादी यांच्या डोक्यात दगड मारला. याबाबत फिर्यादी यांनी आरोपींना विचारणा केली. त्यावरून आरोपींनी लाकडी दांडक्याने फिर्यादी यांना मारहाण केली. तसेच शिवीगाळ आणि दमदाटी केली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.