किरकोळ कारणावरून महिलेस दगडाने मारहाण

0
384

पिंपरी, दि. 3 (पीसीबी) : बूट फेकून दिल्याच्या कारणावरून दोघांनी एका महिलेला शिवीगाळ केली. याचा जाब विचारण्यासाठी मुली सोबत आलेल्या महिलेला दगडाने मारून जखमी केले. ही घटना शुक्रवारी (दि.1) रात्री आठ वाजताच्या सुमारास बौद्धनगर पिंपरी येथे घडली. सुनील राम (वय 30), गुड्डू राम (वय 22, दोघे रा. बौद्धनगर, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी अनितादेवी सुरेंद्र राम (वय 40, रा. बौद्धनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी यांनी आरोपींचे बूट फेकून दिले. त्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ केली. या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी शुक्रवारी रात्री फिर्यादी आणि त्यांची मुलगी आरोपीकडे गेल्या. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांना दगडाने मारून जखमी केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.