किरकोळ कारणावरून तरुणास मारहाण

0
601

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – दुकानातून बूट खरेदी करू नको म्हणत चार जणांनी मिळून एका तरुणाला मारहाण केली. ही घटना १६ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजता पिंपरी मधील ए बी शूज येथे घडली.

अनिकेत क्रिशनंदू घोष (वय १९, रा. पिंपरी) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार साहिल चंडालिया, सुमित माने, ढोकालिया आणि अन्य एकजण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास पिंपरी मधील गणेश शूज या दुकानात बूट खरेदी करण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपी तिथे आले. त्यांनी फिर्यादी यांना ‘तू येथून बूट विकत घेऊ नको’ असे म्हटले. त्यावर ‘मी इथूनच बूट घेणार’ असे फिर्यादी यांनी सांगितले. त्यावरून आरोपींनी शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. आरोपी सुमित याने स्टील स्ट्रीक फिर्यादी यांच्या डोक्यात मारून जखमी केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.