काही लोकांसाठी परिवारच पक्ष; मोदींचा प्रियंका गांधींवर निशाणा  

0
749

नवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) – काही लोकांसाठी परिवारच पक्ष आहे. आमच्यासाठी पक्ष हा परिवार आहे. आमचा विरोध काँग्रेसच्या संस्कृतीला आहे. काँग्रेसमुक्त देश याचा अर्थ काँग्रेसमुक्त संस्कृती, असा अप्रत्यक्ष टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रियंका गांधी यांच्या सक्रीय राजकारणाच्या प्रवेशावर लगावला.

काँग्रेसने आज (बुधवार) प्रियंका गांधी यांना सरचिटणीस पद दिले. यावर मोदी यांनी तीव्र प्रतिक्रिया देताना प्रियंका गांधी यांचे नाव न घेता काही लोकांसाठी परिवारच पक्ष असतो, असे म्हटले आहे. महाराष्ट्रातील बुथ कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने प्रियंका गांधी यांना काँग्रेसचे सरचिटणीसपद दिले. भाजपाचे वर्चस्व  असलेल्या उत्तर प्रदेशातील पूर्वांचल प्रदेशाची जबाबदारी देण्यात आली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात त्या कार्यभार स्वीकारणार आहेत. त्यांच्या सक्रीय राजकारणामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.