काही कळायच्या आतच त्याला जोरात धडक बसली आणि….

0
186

चाकण, दि.१० (पीसीबी) – दुचाकीवरून जात असताना अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरात धडक दिली. त्यात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. तसेच गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही घटना 14 जानेवारी रोजी रात्री साडेबारा वाजता पुणे-नाशिक रोडवर पायसर चौक येथे घडली.

विलास उत्तम बांडे (वय 27, रा. कोरडेमळा, ज्ञानेश्वर नगर, बोरी, ता. जुन्नर, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत शामसुंदर नवनाथ नाईकवाडे (वय 30, रा. दगडूपाटील नगर, थेरगाव) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत विलास बांडे त्याच्या दुचाकीवरून (एम एच 14 / सी ई 8896) हडपसर येथून चाकणकडे येत होता. कुरुळी गावाजवळ आल्यानंतर पायसर चौकात अज्ञात वाहनाने बांडे याच्या दुचाकीला जोरात धडक दिली. त्यात दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर बांडे याचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. याबाबत 9 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.